पोस्ट्स

नाना फडणवीस- एक बुद्धिमान मराठा

इमेज
     द लॉस्ट हिरोज सादर करत आहेत, एकेकाळी २/३ भारतवर्षावर पसरलेल्या बलशाली मराठा साम्राज्यात होऊन गेलेल्या, पेशवाईतील साडेतीन पैकी अर्धे शहाणे म्हणून ओळख असणाऱ्या मुत्सद्दी, बुद्धिमान नेत्याची कहाणी... नाना फडणवीस : एक बुद्धिमान मराठा   'महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा!'      - सेनापती बापटांनी लिहिलेल्या या ओळी महाराष्ट्राच्या स्वभावाला अत्यंत चपखल लागू पडतात. महाराष्ट्राच्या भूमीने आजवर अनेक वीर, कलाकार, समाजसुधारक, साहित्यिक आणि मुत्सद्दी व्यक्तींना जन्म दिलेला आहे. यापैकी सर्वांनीच भारताच्या सर्वांगीण विकासाच्या कामात आपला सिंहाचा वाटा उचलला यात संशय नाही. सर्वांची नावे विस्तारभयास्तव देता येणे कठीण आहे पण महाराष्ट्रातील अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर आता येत असतील. पण असे असूनही आपल्या मुत्सद्देगिरीने ओळखला जावा असा व्यक्ती निराळाच डोळ्यासमोर येतो... साधारणपणे, पेशव्यांच्या कालखंडात 'नाना फडणवीस' नावाच्या व्यक्तीने आपल्या बुद्धीचातुर्य, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी याच्या बळावर तो मा

लचित बरफुकान (हिंदी)-२

इमेज
          "म्लेंच्छ संहारक :লা-চিত"                           - कहानी रक्तरंजित शौर्य की      चूँकि पहली लड़ाई गोहोटी (आज के गुवाहाटी) में होनी थी, दुश्मन को हराने के लिए एक उपयुक्त सेनापति का चयन करना आवश्यक था। सेना के प्रति निष्ठा, दृढ़ता, साहस, वीरता एवं नेतृत्व जैसे आवश्यक गुणों पर चर्चा करने के बाद आखिरकार लचित के नाम पर मुहर लगा दी गई। दूसरे दिन जब दरबार में लचित को बुलाया गया, तब उन्होंने राजा के सामने घुटने टेक प्रणाम किया; तभी एक सिपाही ने उनका मुकुट चुरा लिया। आगबबूले हुए लाचित  ने उसका पीछा किया और उसे पकड़ लिया, वह उसका सिर काटने ही वाले थे, तब राजा के क्या हुआ पूछे जाने पर, "इसने मेरा मुकुट चुराकर मुझे अपमानित किया है, और कोई भी जातिवादी योद्धा ऐसा अपमान नहीं सहेगा।" तब राजा ने बताया कि वह लचित की परीक्षा ले रहे थे। वह व्यक्ति जो राजसम्मन को प्राणों से भी श्रेष्ठ मानता है, वह सर्वोत्तम संभव तरीके से सेना का नेतृत्व कर सकता है। लचित परीक्षा में पूरी तरह से सफल हो चुके थे और राजा ने लचित को देश का अपमान धोने हेतु गोहाटी भेज दिया।        दूत का संदेश सुनक

लचीत बरफुकान (हिंदी)

इमेज
     इ.स. १७ वी सदी,भारतवर्ष के पुर्वोत्तर भाग में एक लडा़ई लडी़ जा रही थी; दोंनो प्रतिस्पर्धी आमने सामने अपनी मजबुत नौसेना सहीत खडे थे | एक समुह अपना अस्तित्व टिकाने हेतू तो दुसरा अहंकार...  पर अतंतः सत्य ने अहंकार पर जीत हासिल करते हुंऐ अपना अस्तित्व टिकाया! पढीए इस लेख में...    Image source: wikimedia commons        पुर्वोत्तर भारत नैसर्गिक संसाधनो से युक्त एक बहुत सुंदर प्रदेश। पुर्वीय हिमालय कि गर्ता में बसे हुऐ इस प्रदेश की (7sister) इस नाम से पहचान है। इस प्रदेश ने भारतवर्ष का हर मुश्किल घडी में खुब तरीके से साथ निभाया है ; लेकिन इस प्रदेश को हम हर बार क्यों ठुकराते है ? सिर्फ उनका चेहरा हम सें अलग है इस लिऐ ? क्यों हम उनसे उन्हीं के देश में विदेशीओं तरह व्यवहार करते है? सब भारतवासी भाई-बहन है,वो सिर्फ कहने के लिऐ  ?      प्रस्तुत लेख में पुर्वोतर भारत में १७ वी सदी में हुए हुए एक महान योद्धा की जानकारी दे रहे है , जिन्होंने अपनी मातृभुमी के रक्षण हेतु बलिदान दिया परंतु ऐसे योद्धा की जानकारी हम तक बहुत कम मात्रा में पहुंची. "म्लेंच्छ संहारक :লা-চিত"                  

म्लेंच्छ संहारक: লা-চিত, कथा रक्तरंजित योध्याची

इमेज
 भाग- २ "म्लेंच्छ संहारक: লা-চিত"                           - कथा रक्तरंजित शौर्याची      गोहोटी (आजची गुवाहाटी) येथे सैन्याची पहिली धडक होणार असल्याने शत्रुसैन्यास नामोहरम करण्यासाठी सुयोग्य सेनापतीची निवड होणे गरजेचे होते. सैन्याची निष्ठा, धैर्य कायम ठेऊन स्वतः धैर्य , शौर्य व नेतृत्वाने लढेल अशा आवश्यक त्या गुणांवर चर्चा होऊन अखेर लाचीत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील दिवशी दरबारी लाचीत यांना बोलावले असता , राजासमोर त्यांनी गुडघे टेकवून मुजरा केला; तोच एका रक्षकाने त्यांचे शिरस्त्राण पळविले. क्रोध अनावर झालेल्या लाचीतने त्याचा पाठलाग करून पकडले व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात राजाने विचारले असता, "माझा शिरपेच पळवून त्याने माझा अपमान केला आहे व कोणताही जातिवंत योद्धा असा अपमान सहन करणार नाही" असं म्हणताच राजांनी आपण तुझी परीक्षा पाहत असल्याचे सांगितले. राजसम्मान प्राणापेक्षाही श्रेष्ठ मानणाराच सेनेचे नेतृत्व उत्कृष्ट प्रकारे करू शकतो. लाचित कसोटीत पूर्ण उतरला होता, आपल्या राज्याचा झालेला अपमान धुवून काढण्यासाठी हा सर्वथा योग्य आहे असे राजाने सांगून

म्लेंच्छ संहारक: লা-চিত, कथा रक्तरंजित योध्याची

इमेज
       इ.स. १७वे शतक, भारतवर्षाच्या सुदूर ईशान्य भागात एक युद्ध लढले जात होते; दोन्ही प्रतिद्वंद्वी समोरासमोर आपल्या बलाढ्य अश्या नौदलानिशी उभे होते. एक गट आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तर दुसरा अहंकार... पण अंततः सत्याने अहंकारावर विजय मिळवून अस्तित्व टिकवलेच!  वाचा या लेखात....          Image source: wikimedia commons          ईशान्य भारत नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात लाभलेला एक अतिशय सुंदर भूभाग. पूर्व हिमालयाच्या कुशीत वसलेला हा भाग सध्या 'सात भगिणी' (7 sisters) या नावाने ओळखला जातो. या भागाने भारतवर्षास प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे; परंतु आपण का या भागास डावलतो ? फक्त त्यांच्या चेहऱ्याची ठेवण आपल्या सारखी नाही म्हणून ? का ? आपण त्यांना त्यांच्याच देशात परकियांसरखी वागणूक देतो ? सारे भारतीय माझे बांधव आहेत, ते फक्त म्हणाण्यापुरतेच?          प्रस्तुत लेखात ईशान्य भारतात सतरा व्या शतकात होऊन गेलेल्या एका थोर योध्दयाबद्दल माहिती देत आहोत, ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ सर्वस्वाचे बलिदान दिले परंतु अश्या  योद्ध्याची माहिती आपल्यापर्यंत अतिशय तोडक्या प्रमाणात आल

योगीराज श्री कल्याण स्वामी

इमेज
                                 उत्तरार्ध                        वाटे इतराला समाधिस्थ |                       परी प्रत्यक्ष असती नांदत ||                      पाहता भक्तांनी शुद्धभावार्थे |                      प्रगटोन करिती सांभाळ ||       इ.स. १६७८ च्या सुमारास महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारतवर्षावर परकीय (म्लेंच्छ) आक्रमणे बहू प्रमाणात होती. श्री शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची घोडदौड देखील सुरू होतीच परंतु, मराठवाडा हा चहूबाजूंनी परकीय आक्रांतांच्या अत्याचारास बळी पडत होता; अश्या परिस्थितीत स्वराज्यासाठी सशक्त व सुदृढ समाज निर्माण करणे गरजेचे होते. ही बाब जाणून समर्थ रामदास स्वामींच्या आज्ञेवरून समर्थ शिष्य कल्याण सज्जनगड सोडून धाराशिव (आजचे उस्मानाबाद) भागातील सीना नदीतीरावरील डोमगाव या ठिकाणी आपल्या पुढील कार्यासाठी स्थायिक झाले. डोमगाव कडे जाण्यापूर्वी वाटेत शिरगाव येथे बंधू दत्तात्रेय स्वामींची भेट घेऊन, पंढरपूर, तुळजापूर इ. देवस्थानांचे दर्शन घेऊन ते सोबतीस १४ शिष्यांसोबत पुढील वाटेस लागले. योगिराज श्री कल्याण स्वामी डोमगाव परिसरामध्ये  आल्यानंतर वर्षातील प्र

योगीराज श्री कल्याण स्वामी

इमेज
                                       पूर्वार्ध         प्रस्तुत लेखात आपण १७ व्या शतकात जन्मलेल्या एक थोर संताची म्हणजेच 'योगीराज श्री कल्याण स्वामींची' माहिती पाहणार आहोत. कल्याण स्वामींनी परकीय आक्रांतांच्या काळात, अतीव संघर्षमय परिस्थितीत बलोपासना, कीर्तने, धर्मजागरण, समाज प्रबोधन व संघटन करून शिव छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासाठी सुदृढ, सजग व सशक्त समाज निर्माणाचे प्रभावी कार्य केले. ' समर्थांचे बहिश्चर प्राण ' असलेल्या कल्याण स्वामींच्या काळाच्या पडद्याआड लपून राहिलेल्या कार्याला पुनः उजाळी देण्याचा प्रयत्न.... कल्याण नामा ग्रंथ विस्तारी, उत्कट कीर्ती विश्वाभीतरी देहांत साधने गुरु आज्ञेकरी, कल्याण चराचरी पावला नाम।।         नाशिक जवळील भोगुर (भगूर नाही) गावचे कुलकर्णी कृष्णाजीपंत यांचा विवाह झाला व त्यांना अपत्य प्राप्ती झाली. परंतु दुर्दैवाने त्यांची पत्नी व ते अपत्य थोड्याच कालावधी मध्ये मृत्यू पावले. ऐन तारुण्यात झालेल्या या आघातामुळे कृष्णाजीपंत गावातील सर्व निरवनिरवी करुन तीर्थाटनासाठी बाहेर पडले. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते श्री महालक्ष्मीच्या दर्शना