योगीराज श्री कल्याण स्वामी
उत्तरार्ध वाटे इतराला समाधिस्थ | परी प्रत्यक्ष असती नांदत || पाहता भक्तांनी शुद्धभावार्थे | प्रगटोन करिती सांभाळ || इ.स. १६७८ च्या सुमारास महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारतवर्षावर परकीय (म्लेंच्छ) आक्रमणे बहू प्रमाणात होती. श्री शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची घोडदौड देखील सुरू होतीच परंतु, मराठवाडा हा चहूबाजूंनी परकीय आक्रांतांच्या अत्याचारास बळी पडत होता; अश्या परिस्थितीत स्वराज्यासाठी सशक्त व सुदृढ समाज निर्माण करणे गरजेचे होते. ही बाब जाणून समर्थ रामदास स्वामींच्या आज्ञेवरून समर्थ शिष्य कल्याण सज्जनगड सोडून धाराशिव (आजचे उस्मानाबाद) भागातील सीना नदीतीरावरील डोमगाव या ठिकाणी आपल्या पुढील कार्यासाठी स्थायिक झाले. डोमगाव कडे जाण्यापूर्वी वाटेत शिरगाव येथे बंधू दत्तात्रेय स्वामींची भेट घेऊन, पंढरपूर, तुळजापूर इ. देवस्थानांचे दर्शन घेऊन ते सोबतीस १४ शिष्यांसोबत पुढील वाटेस लागले. योगिराज श्री कल्याण स्वामी डोमगाव परिसरामध्ये आल्यानंतर वर्षातील प्र