पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाना फडणवीस- एक बुद्धिमान मराठा

इमेज
     द लॉस्ट हिरोज सादर करत आहेत, एकेकाळी २/३ भारतवर्षावर पसरलेल्या बलशाली मराठा साम्राज्यात होऊन गेलेल्या, पेशवाईतील साडेतीन पैकी अर्धे शहाणे म्हणून ओळख असणाऱ्या मुत्सद्दी, बुद्धिमान नेत्याची कहाणी... नाना फडणवीस : एक बुद्धिमान मराठा   'महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा!'      - सेनापती बापटांनी लिहिलेल्या या ओळी महाराष्ट्राच्या स्वभावाला अत्यंत चपखल लागू पडतात. महाराष्ट्राच्या भूमीने आजवर अनेक वीर, कलाकार, समाजसुधारक, साहित्यिक आणि मुत्सद्दी व्यक्तींना जन्म दिलेला आहे. यापैकी सर्वांनीच भारताच्या सर्वांगीण विकासाच्या कामात आपला सिंहाचा वाटा उचलला यात संशय नाही. सर्वांची नावे विस्तारभयास्तव देता येणे कठीण आहे पण महाराष्ट्रातील अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर आता येत असतील. पण असे असूनही आपल्या मुत्सद्देगिरीने ओळखला जावा असा व्यक्ती निराळाच डोळ्यासमोर येतो... साधारणपणे, पेशव्यांच्या कालखंडात 'नाना फडणवीस' नावाच्या व्यक्तीने आपल्या बुद्धीचातुर्य, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी याच्या बळावर तो मा